Monday 18 October 2021

स्वप्न एक रहस्यमय घटक

स्वप्न का , कशे , केव्हा ?

मित्र हो,
असं कोणी ही नाही जो स्वप्न बघत नसेल . नवजात शिशु ही गालात हसतांना दिसतो व वयस्कर ही झोपेतून फडफडून उठतांना दिसतात. 
जो पडला की झोपला तो पहाटे स्वप्नात रंगतो व रातों के राजा हा रात्री स्वप्नमय होऊन झोपतो. मला काय/कोण हवंय , काय व्हायचं व माझ्याशी काय घडावं , माझं काय होईल , मी कोण हे चिंतन च तुमच्या स्वप्ननाचे मूळ. विज्ञान म्हणतं की रेपीड आय मूव्हमेंट म्हणजे रात्री आपण झोपण्याच्या अवस्थेत असतो पण मेंदू सक्रिय असतांना दिसणाऱ्या घटना म्हणजे च स्वप्न . त्याची कारणे अनिंद्रा , चिंता, खुशी, आतुरता, आघात व इमोशन अशे असतात. साधारणपणे जे मनातील विचार आहेत त्या संबंधीत स्वप्ने पडतात . हिंदू शास्त्रानुसार स्वप्न ही येणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असतात. पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तावर पडणारी स्वप्ने बहुतेक खरी ठरतात हा माझा ही व्यक्तिगत अनुभव आहे. स्वप्नात च साक्षात्कार ही घडतात , चुका ही दाखवले जातात व अदृश्य शक्ती सोबत संवाद ही साधले जाऊ शकतात. आपण खूप ठिकाणी वाचतो की अमुक संताला देवाने किंवा समाधिस्थ गुरूंनी स्वप्नात येऊन दीक्षा दिली व गुरुमंत्र दिला. थोडक्यात अदृश्य ला दृश्यमान करतात ती स्वप्ने. 
नवजात शिशूला मागच्या जन्मातील घटनांची स्वप्ने पडतात असं म्हणतात. तरुणपणी जीवनसाथी - सपनो का राजकुमार/राजकुमारी आदी स्वप्नात येतात तर मृत्यूशैयेवर सहा मिनिटांची एक क्लिप यमदूत दाखवतो अशी मान्यता आहे ज्यात आयुष्यभर केलेली पाप-पुण्य दाखवून ती मान्य करून घेतली जातात व मगच जीव बाहेर निघतो ती सुद्धा स्वप्न च म्हणावी. सटीक पद्धतीने केलेले डीप मेडिटेशन- ध्यान, जप-तप ह्या सिक्सथ सेन्स ला जागृत करतात  , म्हणजे च होणाऱ्या घटनांचा पूर्व अंदाज यायला लागतो , जास्त करून स्वप्नात दृष्टांत होतो व तो अचूक ठरतो. माझी स्वराशी असल्याने मी सांगू शकतो की कर्क ही सर्वात जास्त स्वप्ने बघणारी व कल्पनेच्या जगात वावरणारी रास आहे. जर ह्याला ध्यान व साधनेची जोड असेल तर एक चांगला भविष्यवेत्ता घडू शकतो व समोर आलेल्या व्यक्ती ला - जसे की स्कॅनिंग करू शकतो. 

मागे , कपिल शर्मा च्या एका शो मध्ये रजत शर्माने सांगितले होते की आम्ही गरिबीतून आलोय पण आमच्या वडीलांनी आम्हाला स्वप्न बघायला शिकवलं , की तुम्हाला बाजूवाले TV बघायला येऊ देत नाहीत ना ; मग अशी कामे करा की तुम्ही थेट TV वर याल व ते तुम्हाला बघण्यास उत्सुक असतील . स्वप्ने हीच आमच्या सफलतेची गुरुकिल्ली असं त्यांनी खास नमूद केलं होतं. गरोदर स्त्रिया खूप स्वप्ने बघतात असे ही एका सर्वेक्षणात आढणून आले आहे.

असो, 
आळशी माणसांचे सुखाचे साधन ही स्वप्न च होय . मेहनत करून बंगला गाडी मिळवण्यासाठी काम कशाला करावे बुवा , स्वप्नात रमून आनंद घ्यावा हे त्यांचे सूत्र. तसे , इन्ग्रेजी राजस्नुषा 'लेडी डायना' ही विश्वातील सर्वात जास्त लोकांची स्वप्नसुंदरी होती असे मानले जाते व येथे आळशी नव्हे तर कमकुवत लोकांसाठी स्वप्ने वरदान ठरलेली असावीत. 😊 विनोद म्हणून घ्यावे किंवा स्वप्नात येऊन माझ्यावर टीकास्त्र सोडावे - सूट आहे. 
ह्यापरी माझे विचार मांडतो. काही अनुभवाचे ही बोल आहेत ह्यात. स्वप्ने ही बहुतेक खोटी असतात व ते तुमच्या चिंते चे व तणावाचे सबब बनू नये ह्याची दक्षता घ्यावी. स्वप्नात नेहमी गाभरणाऱ्या मुलांच्या उशीखाली धारदार चाकू ठेवावे तर अशी स्वप्न पडणे बंद होतात. माणसाने नेहमी मोठी स्वप्ने बघावी च. Law of Attraction म्हणतो की जे आकर्षित कराल ते च घडेल . स्वप्ने मोठी बघा व ते च आकर्षित करा . मी सध्या मर्सडीस आकर्षित करतोय , बघू कधी येतेय ती , नक्की च येईल व मी माझे म्हणणे लवकर च सिद्ध ही करेल. आळशी व सकाळी लवकर न उठू शकणाऱ्या लोकांना काही दिवस जबरदस्तीने पहाटे लवकर उठवावीत व स्वप्ने बघणे थांबवणे तरच आल्सय दूर होईल. स्वप्ने ही पितृचें , गुरूंचे व देवांचे ही द्वार निष्चितच आहे , नीट ऐकावे त्यांचे म्हणणे. लक्षात राहणारी स्वप्ने अतिशय घातक असतात , शक्यतो लवकरात लवकर वाईट स्वप्ने झटकुन टाकावी व विसरून जावी - अंतर्मनात जाण्या वाचून रोखावी. पूर्वीचे ऋषी मुनी स्वप्नात येऊन मार्गदर्शन करायचे असे म्हणतात , ती पण एक विद्याच होती. काही ही असो , अजून स्वप्न हे एक न उकल झालेलं कोडं आहे व राहणार च , कारण हे बाह्य इंद्रियांचे काम नाही व आंतरेन्द्रिय अजून ही माणसाच्या ज्ञानक्षमतेच्या बाहेर आहे. 
काही मानसिक रोगांचे कारण ही स्वप्ने आहेत , काही औषधांचे साईड इफेक्ट म्हणून ही स्वप्न पडतात असे संशोधन म्हणते. वाईट व त्रासदायक स्वप्नावरील इलाज हे ध्यान , योगा , बॉडी रिलॅक्स ठेवणे व नेहमी आनंदात राहणे हे आहे. 
स्वप्नाबद्दल काही सुवाक्य आहेत:

सपनो को सच करने का सबसे अच्छा तरीका है कि जाग जाओ...!!

सपने वो नहीं जो निंद में आये, सपने तो वो है जो आपको सोने न दे - अब्दुल कलाम

तर , माझा लांब लचक लेख वाचता वाचता तुम्ही स्वप्नात गर्क होऊ नये म्हणून येथे च थांबतो व माझे विचार व अनुभव वेगळे असू शकतात ह्याची कबुली देत - पुर्ण विराम.

टीप: शंभर पैकी नव्यांनव लोकांना गुप्तधना बद्दल उत्सुकता असते व कोणी तरी बावा बुवाने त्यांना सांगितले असते की तुमच्या नशिबात गुप्तधन आहे म्हणून... ते कुठे आहे हे सुद्धा ती अदृश्य शक्ती स्वप्नात च सांगत असते..😊😊

हितेश कारिया
१८/१०/२०२१