Monday 18 October 2021

स्वप्न एक रहस्यमय घटक

स्वप्न का , कशे , केव्हा ?

मित्र हो,
असं कोणी ही नाही जो स्वप्न बघत नसेल . नवजात शिशु ही गालात हसतांना दिसतो व वयस्कर ही झोपेतून फडफडून उठतांना दिसतात. 
जो पडला की झोपला तो पहाटे स्वप्नात रंगतो व रातों के राजा हा रात्री स्वप्नमय होऊन झोपतो. मला काय/कोण हवंय , काय व्हायचं व माझ्याशी काय घडावं , माझं काय होईल , मी कोण हे चिंतन च तुमच्या स्वप्ननाचे मूळ. विज्ञान म्हणतं की रेपीड आय मूव्हमेंट म्हणजे रात्री आपण झोपण्याच्या अवस्थेत असतो पण मेंदू सक्रिय असतांना दिसणाऱ्या घटना म्हणजे च स्वप्न . त्याची कारणे अनिंद्रा , चिंता, खुशी, आतुरता, आघात व इमोशन अशे असतात. साधारणपणे जे मनातील विचार आहेत त्या संबंधीत स्वप्ने पडतात . हिंदू शास्त्रानुसार स्वप्न ही येणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असतात. पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तावर पडणारी स्वप्ने बहुतेक खरी ठरतात हा माझा ही व्यक्तिगत अनुभव आहे. स्वप्नात च साक्षात्कार ही घडतात , चुका ही दाखवले जातात व अदृश्य शक्ती सोबत संवाद ही साधले जाऊ शकतात. आपण खूप ठिकाणी वाचतो की अमुक संताला देवाने किंवा समाधिस्थ गुरूंनी स्वप्नात येऊन दीक्षा दिली व गुरुमंत्र दिला. थोडक्यात अदृश्य ला दृश्यमान करतात ती स्वप्ने. 
नवजात शिशूला मागच्या जन्मातील घटनांची स्वप्ने पडतात असं म्हणतात. तरुणपणी जीवनसाथी - सपनो का राजकुमार/राजकुमारी आदी स्वप्नात येतात तर मृत्यूशैयेवर सहा मिनिटांची एक क्लिप यमदूत दाखवतो अशी मान्यता आहे ज्यात आयुष्यभर केलेली पाप-पुण्य दाखवून ती मान्य करून घेतली जातात व मगच जीव बाहेर निघतो ती सुद्धा स्वप्न च म्हणावी. सटीक पद्धतीने केलेले डीप मेडिटेशन- ध्यान, जप-तप ह्या सिक्सथ सेन्स ला जागृत करतात  , म्हणजे च होणाऱ्या घटनांचा पूर्व अंदाज यायला लागतो , जास्त करून स्वप्नात दृष्टांत होतो व तो अचूक ठरतो. माझी स्वराशी असल्याने मी सांगू शकतो की कर्क ही सर्वात जास्त स्वप्ने बघणारी व कल्पनेच्या जगात वावरणारी रास आहे. जर ह्याला ध्यान व साधनेची जोड असेल तर एक चांगला भविष्यवेत्ता घडू शकतो व समोर आलेल्या व्यक्ती ला - जसे की स्कॅनिंग करू शकतो. 

मागे , कपिल शर्मा च्या एका शो मध्ये रजत शर्माने सांगितले होते की आम्ही गरिबीतून आलोय पण आमच्या वडीलांनी आम्हाला स्वप्न बघायला शिकवलं , की तुम्हाला बाजूवाले TV बघायला येऊ देत नाहीत ना ; मग अशी कामे करा की तुम्ही थेट TV वर याल व ते तुम्हाला बघण्यास उत्सुक असतील . स्वप्ने हीच आमच्या सफलतेची गुरुकिल्ली असं त्यांनी खास नमूद केलं होतं. गरोदर स्त्रिया खूप स्वप्ने बघतात असे ही एका सर्वेक्षणात आढणून आले आहे.

असो, 
आळशी माणसांचे सुखाचे साधन ही स्वप्न च होय . मेहनत करून बंगला गाडी मिळवण्यासाठी काम कशाला करावे बुवा , स्वप्नात रमून आनंद घ्यावा हे त्यांचे सूत्र. तसे , इन्ग्रेजी राजस्नुषा 'लेडी डायना' ही विश्वातील सर्वात जास्त लोकांची स्वप्नसुंदरी होती असे मानले जाते व येथे आळशी नव्हे तर कमकुवत लोकांसाठी स्वप्ने वरदान ठरलेली असावीत. 😊 विनोद म्हणून घ्यावे किंवा स्वप्नात येऊन माझ्यावर टीकास्त्र सोडावे - सूट आहे. 
ह्यापरी माझे विचार मांडतो. काही अनुभवाचे ही बोल आहेत ह्यात. स्वप्ने ही बहुतेक खोटी असतात व ते तुमच्या चिंते चे व तणावाचे सबब बनू नये ह्याची दक्षता घ्यावी. स्वप्नात नेहमी गाभरणाऱ्या मुलांच्या उशीखाली धारदार चाकू ठेवावे तर अशी स्वप्न पडणे बंद होतात. माणसाने नेहमी मोठी स्वप्ने बघावी च. Law of Attraction म्हणतो की जे आकर्षित कराल ते च घडेल . स्वप्ने मोठी बघा व ते च आकर्षित करा . मी सध्या मर्सडीस आकर्षित करतोय , बघू कधी येतेय ती , नक्की च येईल व मी माझे म्हणणे लवकर च सिद्ध ही करेल. आळशी व सकाळी लवकर न उठू शकणाऱ्या लोकांना काही दिवस जबरदस्तीने पहाटे लवकर उठवावीत व स्वप्ने बघणे थांबवणे तरच आल्सय दूर होईल. स्वप्ने ही पितृचें , गुरूंचे व देवांचे ही द्वार निष्चितच आहे , नीट ऐकावे त्यांचे म्हणणे. लक्षात राहणारी स्वप्ने अतिशय घातक असतात , शक्यतो लवकरात लवकर वाईट स्वप्ने झटकुन टाकावी व विसरून जावी - अंतर्मनात जाण्या वाचून रोखावी. पूर्वीचे ऋषी मुनी स्वप्नात येऊन मार्गदर्शन करायचे असे म्हणतात , ती पण एक विद्याच होती. काही ही असो , अजून स्वप्न हे एक न उकल झालेलं कोडं आहे व राहणार च , कारण हे बाह्य इंद्रियांचे काम नाही व आंतरेन्द्रिय अजून ही माणसाच्या ज्ञानक्षमतेच्या बाहेर आहे. 
काही मानसिक रोगांचे कारण ही स्वप्ने आहेत , काही औषधांचे साईड इफेक्ट म्हणून ही स्वप्न पडतात असे संशोधन म्हणते. वाईट व त्रासदायक स्वप्नावरील इलाज हे ध्यान , योगा , बॉडी रिलॅक्स ठेवणे व नेहमी आनंदात राहणे हे आहे. 
स्वप्नाबद्दल काही सुवाक्य आहेत:

सपनो को सच करने का सबसे अच्छा तरीका है कि जाग जाओ...!!

सपने वो नहीं जो निंद में आये, सपने तो वो है जो आपको सोने न दे - अब्दुल कलाम

तर , माझा लांब लचक लेख वाचता वाचता तुम्ही स्वप्नात गर्क होऊ नये म्हणून येथे च थांबतो व माझे विचार व अनुभव वेगळे असू शकतात ह्याची कबुली देत - पुर्ण विराम.

टीप: शंभर पैकी नव्यांनव लोकांना गुप्तधना बद्दल उत्सुकता असते व कोणी तरी बावा बुवाने त्यांना सांगितले असते की तुमच्या नशिबात गुप्तधन आहे म्हणून... ते कुठे आहे हे सुद्धा ती अदृश्य शक्ती स्वप्नात च सांगत असते..😊😊

हितेश कारिया
१८/१०/२०२१

Friday 10 September 2021

हतगड किल्ला विषयी माहिती

हतगड किल्ला, सापुतारा जवळ , नाशिक

हतगड किल्ला .....

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीदरम्यान जिंकलेला "हतगड"  सुंदर अन् ऐतिहासिक किल्ला आहे. नाशिकहून सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच "हतगड" . हतगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड आणि हस्तगिरी असेही म्हटले जाते. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्किद १३०० ते १७०० अशी आहे. तर रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन १५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी" हतगड" निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसतो. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला होता. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती. दिल्लीच्या अकबर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल यांचा मुलगा हसन अली याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी स्वारी केली. त्यावेळी किल्लेदार गंगाजी मोरे या किल्लेदाराने निकराचा लढा दिला. मात्र मोरेंचा पराजय झाला. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ रोजी हतगडची सोन्याची प्रतिकृत चिन्ह सादर केली होती. यावेळी बादशहाने हसनअलीला ‘खान’ ही पदवी बहाल केली. हतगडच्या पायथ्याशी गंगाजी मोरे या किल्लेदाराची समाधीही आहे. हतगडचे चढन अगदी सोपे असून, वरपर्यंत गाडी जाते. हतगडचे प्रवेशद्वार, शिलालेख व गडावरील इमारतींचे अवशेष तसेच धान्य कोठारे व पाण्याचे टाके पाहण्यासारखे आहेत..

गणेश उत्सव और गणपतिजी की विशेषताएं

गणेश चतुर्थी उत्सव
महाराष्ट्र में लोकमान्य तिलक द्वारा भारत की स्वतंत्रता के लिए शुरू किए गए जनजागरण अभियान का एक हिस्सा गणेश उत्सव रहा है । आइये जानते है कुछ रोचक जानकारियाँ ।
*गणेश पुराण के अनुसार भगवान गणेश का जन्म भाद्रमास की शुक्ल पक्ष की चतुर्थी तिथि को हुआ था।* इसलिए हर साल भाद्र मास में शुक्ल पक्ष की चतुर्थी तिथि को गणेश उत्सव मनाया जाता है। गणेश को वेदों में ब्रह्मा, विष्णु, एवं शिव के समान आदि देव के रूप में वर्णित किया गया है। इनकी पूजा त्रिदेव भी करते हैं।भगवान श्री गणेश सभी देवों में प्रथम पूज्य हैं। शिव के गणों के अध्यक्ष होने के कारण इन्हें गणेश और गणाध्यक्ष भी कहा जाता है। भगवान श्री गणेश मंगलमूर्ति भी कहे जाते हैं क्योंकि इनके सभी अंग जीवन को सही दिशा देने की सिख देते हैं।

*बड़ा मस्तक*
गणेश जी का मस्तक काफी बड़ा है। ज्योतिष विज्ञान बड़े मस्तिष्क को काफी नसीबदार मानता है । अंग विज्ञान के अनुसार बड़े सिर वाले व्यक्ति नेतृत्व करने में योग्य होते हैं। इनकी बुद्घि कुशाग्र होती है। गणेश जी का बड़ा सिर यह भी ज्ञान देता है कि अपनी सोच को बड़ा बनाए रखना चाहिए।
*छोटी आंखें*
गणपति की आंखें छोटी हैं। छोटी आंखों वाले व्यक्ति चिंतनशील और गंभीर प्रकृति के होते हैं, यह समजाती है कि हर चीज को सूक्ष्मता से देख-परख कर ही कोई निर्णय लेना चाहिए। ऐसा करने वाला व्यक्ति कभी धोखा नहीं खाता।
*सूप जैसे लंबे कान*
गणेश जी के कान सूप जैसे बड़े हैं इसलिए इन्हें गजकर्ण एवं सूपकर्ण भी कहा जाता है। अंग विज्ञान के अनुसार लंबे कान वाले व्यक्ति भाग्यशाली और दीर्घायु होते हैं। गणेश जी के लंबे कानों का एक रहस्य यह भी है कि वह सबकी सुनते हैं फिर अपनी बुद्धि और विवेक से निर्णय लेते हैं। बड़े कान हमेशा चौकन्ना रहने के भी संकेत देते हैं। गणेश जी के सूप जैसे कान से यह शिक्षा मिलती है कि जैसे सूप बुरी चीजों को छांटकर अलग कर देता है उसी तरह जो भी बुरी बातें आपके कान तक पहुंचती हैं उसे बाहर ही छोड़ दें। बुरी बातों को अपने अंदर न आने दें।
*गणपति की सूंड*
गणेशजी की सूंड हमेशा हिलती डुलती रहती है जो उनके हर पल सक्रिय रहने का संकेत है। यह हमें ज्ञान देती है कि जीवन में सदैव सक्रिय रहना चाहिए। जो व्यक्ति ऐसा करता है उसे कभी दुखः और गरीबी का सामना नहीं करना पड़ता है।
शास्त्रों में गणेश जी की सूंड की दिशा का भी अलग-अलग महत्व बताया गया है। मान्यता है कि जो व्यक्ति सुख-समृद्वि चाहते हो उन्हें दायीं ओर सूंड वाले गणेश की पूजा करनी चाहिए। शत्रु को परास्त करने एवं ऐश्वर्य पाने के लिए बायीं ओर मुड़ी सूंड वाले गणेश की पूजा लाभप्रद होती है।
*लंबोदर* *बड़ा उदर*
गणेश जी का पेट बहुत बड़ा है। इसी कारण इन्हें लंबोदर भी कहा जाता है। लंबोदर होने का कारण यह है कि वे हर अच्छी और बुरी बात को पचा जाते हैं और किसी भी बात का निर्णय सूझबूझ के साथ लेते हैं। अंग विज्ञान के अनुसार बड़ा उदर खुशहाली का प्रतीक होता है। गणेश जी का बड़ा पेट हमें यह ज्ञान देता है कि भोजन के साथ ही साथ बातों को भी पचना सीखें। जो व्यक्ति ऐसा कर लेता है वह हमेशा ही खुशहाल रहता है।
*एकदंत*
बाल्यकाल में भगवान गणेश का परशुराम जी से युद्घ हुआ था। इस युद्घ में परशुराम ने अपने फरसे से भगवान गणेश का एक दांत काट दिया। इस समय से ही गणेश जी एकदंत कहलाने लगे। गणेश जी ने अपने टूटे हुए दांत को लेखनी बना लिया और इससे पूरा महाभारत ग्रंथ लिख डाला। यह गणेश जी की बुद्घिमत्ता का परिचय है। गणेश जी अपने टूटे हुए दांत से यह सीख देते हैं कि चीजों का सदुपयोग किस प्रकार से किया जाना चाहिए। 
श्रीगणेशजी आप सब पर सदैव कृपा बरसातें रहें यही शुभकामनाएं ।

Hitesh Karia
Swamigroups.in