Panchang 12.07.2016
Monday 18 October 2021
स्वप्न एक रहस्यमय घटक
Friday 10 September 2021
हतगड किल्ला विषयी माहिती
गणेश उत्सव और गणपतिजी की विशेषताएं
Sunday 26 January 2020
Corona Virus 2020
Thursday 11 July 2019
वार्षिक राशि भविष्य 2020
लेखक : डॉ. हितेश कारीया , नाशिक
('भृगु संहिता' वर आधारित )
आधि काही गैरसमज काढून घ्या. जन्मपत्रिका ही तुमच्या मागच्या जन्माची बैलेंस शीट आहे . मागच्या जन्मातील चांगल्या व वाइट कर्मानुसार ह्या जन्मी फळ भोगावे लागतात त्याचे अनुमान किंवा अंदाज़ काढणे म्हणजे च ज्योतिष शास्त्र होय. स्वयं रचियेता भृगु ऋषि म्हणतात की हे शास्त्र 60% खरे असेल , पण मात्र 40% तुमचे ह्या जन्माची कर्म तुमचे भाग्य ठरवेन . सदगुरुकृपा , ईश्वर आराधना व चांगली कर्में तुमचे क्रूर ग्रहमानाची तीव्रता कमी करू शकतात . ज्याला आम्ही म्हणतो " तलवार का घाव सुई से जाना " आजकाल ज्योतिष शास्त्रा वर विश्वास कमी होण्यास काही ढोंगी बाबा ही जवाबदार आहेत. ज्योतिष शास्त्र हे अडचणी व त्यावर तोड़गा अशे दोन्ही बाजू समतोल करून वापरले पाहिजे . मी आजारी तर पडेल असे ज्योतिष शास्त्र म्हणत असेल तर त्यावरील उपचार ही त्यानेच द्यायला हवेत हे माझे ठाम मत. चला 12 राशी विषयी बोलुया .
1) मेष राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला 24 जानेवारी पासून शनि – मकर राशि मध्ये, राहु – मिथुन राशित तिसऱ्या भाव मधे आणि 23 स्प्टेम्बर पासून राहु वृषभ च्या दुसऱ्या भाव मधे स्थित होईल. तर गुरु 30 मार्च पासून मकर राशिच्या दशम भाव मधे प्रवेश करेल. शुकाचा अस्त 31 मे पासून 8 जून पर्यंत असेल.
सुखी वैवाहिक जीवना साठी अहंकार त्याग करावा
या वर्षी चौथ्या शनि मुळे तुमच्या कुटुंबामधे वाद विवाद होउ शकतात. जुलाई ते ऑक्टोबर सुखद व रोमांटिक काळ असेल. लहान सहान गोष्टिकडे दुर्लक्ष करावे व शांत रहावे. सुखी वैवाहिक जीवन - घरात नवीन गाड़ी व इतर चैनी च्या वस्तुंची खरेदी होईल , जोड़ीदारा सोबत भरपूर वेळ घालवायच्या संधि येणार , यात्रा प्रवास होईल , वर्षान्ते नवीन सदस्याचे आगमन होउ शकते. एकंदरित हे वर्ष शांत व संयमाने घालवावे व अहंकार दूर ठेवावा. प्रेम विवाह योग उत्तम आहे.
आरोग्य संभाळा
हाडांचे विकार , जांघ, पाय , कंबर आणि हात-पायात संधीवात आणि खांद्यात दुखणे वाढेल. तुमच्या वर कोणी काळा जादू केल्या सारखे वाटेल. व्यसन केल्यास घातक परिणाम होतील व भोजन नियम न पाळल्यास वजन वाढण्याची संभावना आहे. योगासन , व्यायाम , आहार नियमन व शारिरिक काम करणे अत्यावश्यक आहे. हनुमानाचे दर्शन रोज़ घ्यावे.ऑक्टोबर मधे जीवनसाथी चे आरोग्य धोक्यात येईल पण लवकर च बरे ही होईल.
भरभराट व्यापार / कैरियर
कभी धूप कभी छांव सारखे कैरियर ह्या वर्षी मार्च नंतर सामान्य होईल. ज्या साठी प्रयत्न कराल, त्याचे सगळे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील. नोकरीत/व्यवसायात बदल करण्या साठी हे वर्ष चांगले आहे. शनि दशम भावात असल्याने , ग्रहमान चांगले असल्याने तुम्हाला चांगले अवसर प्राप्त होतील. भरपूर प्रगति काळ आहे , व्यवसाय अगर नौकरी साठी लांबचे प्रवास करावे लागेल व चांगले नांव कमवता येईल. व्यापारात सुद्धा भरभराट दिसेल.
आर्थिक स्थिति उत्तम
सट्टा , प्रलोभन ह्या पासून धोका आहे . या वर्षी तुमची आर्थिक स्थिति आहे तशीच उत्तम राहणार आहे. मार्च महिन्या नंतर निवेश करण्या आगोदर सावधानी बाळगावी. धोखाधडीचे शिकार होऊ शकतात. मात्र मागील विचारपूर्वक व सलामत निवेश मधून चांगले लाभ होणार आहे. थोड़ा खर्च वाढेल तरी व्यवसाय चांगले परिणाम देत असल्याने आर्थिक प्रगति निश्चित होईल.
वैदिक उपचार
रोज संध्याकाळी हातपाय धुवून स्वच्छ जागे वर हनुमान चालीसा वाचावी. रोज़ हनुमानाचे दर्शन घ्यावे व श्री रामाचे स्मरण करावे. शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. ज्यांचे स्वभाव रागिट असतील तयांनी त्वरित मोती घालावे. लहान मुलांना खुश ठेवावे जे तुम्हाला सर्वोत्तम मानसिक समाधान देईल.
- (हितेश कारीया - संदर्भ भृगु संहिता)
2) वृषभ राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला ग्रहमान- शनि – अनिष्ट काळ ( अढीच वर्ष ) 24 जानेवारी ला संपेल व शनि तुमच्या नवम भाव मधे स्थित होईल , डोक्यावर चे ओझे कमी झाल्या सारखे वाटेल . गुरु हे – 30 मार्च पासून मकर च्या नवम भाव मधे प्रवेश करेल , राहु दुसऱ्या भाव मधे असेल व 23 स्प्टेम्बर रोर्जी प्रथम भाव मधे स्थित होणार आहे.
तणावग्रस्त कौटुंबिक जीवन
चौथ्या भावच्या कारक सूर्य अष्टमात असल्याने व राहु च्या दुसऱ्या स्थाना मुळे परिस्थिति विकट होत जाणार व वाइट बातमी मिळण्या ची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांमधे मतभेद उत्पन्न होऊन तणाव वाढतील. तुमचा स्वभाव थोडासा चिडखोर होईल मात्र आपण शांत व संयमित राहणे गरजेचे . तुम्ही आपल्या द्वारे होणाऱ्या चुकांची जबाबदारी दुसर्यान्वर टाकू नए. घरात कोणा बरोबर तरी खूप मोठ्या प्रमाणात क्लेश होण्याची प्रबळ संभावना आहे. मन शांत ठेवून घर सोडण्याचे विचार आणु नये.
मानसिक त्रास देणारे - वैवाहिक जीवन - लहान लहान गोष्टीं वरून कलह उत्पन्न होतील. एप्रिल ते जुन पर्यंत लग्न जमु शकेल , मार्च एप्रिल मधे गर्भ धारणा ची बातमी ,अगर मूल जन्मला येऊ शकते. शांति मार्ग ठेवला तर सगळे काही , वर्ष संपे पर्यंत ठीक होईल.
आरोग्य त्रास देईल
गाल , त्वचा संबंधी व्याधि होउ शकेल .बाहेरचे जेवण खातांना फूड प्वाइज़निंग पासून सावधान राहावे. ब्लड शुगर , किडनी व हॄदय विकार सारखे त्रास होतील. एप्रिल मधे वडिलांचे आरोग्य व मे - जून मधे शुक्र अस्त काळात जीवनसाथी चे आरोग्य धोक्यात येईल. मात्र काळजी घेतली तर ह्या वर्षी तुमचे आरोग्य भरपूर चांगले होण्याचे ही उत्तम ग्रहमान आहेत.
कॅरियर/व्यापार
करियर साठी हे वर्ष चांगले नाही तसेच वाइट ही नाही . चौथ्या घरात जर पापग्रह असतील तर तुमच्या सगळ्या आशा मातीत मिळतील. काम कोणी केलय व श्रेय कोण घेऊन जाईल हे स्वतः बघा . मन शांत ठेवित आपले कर्म करीत राहावे . ह्या वर्षी नोकरीत बदलाव करण्याचा विचार नक्की नका. आपल्या मित्रांन बरोबर वेळ व्यतीत करावी. धैर्य ठेवावे. शनि च्या अढैया अनिष्ट काळ 24 जानेवारी रोजी संपल्या नंतर भरपूर संधि समोरून उपलब्ध होईल . विदेश यात्रा ही सम्भवते . व्यापारात धोक्याची घण्टा आहे , अतिशय सावधान राहावे. एकंदरित मध्यम काळ असेल.
उत्तम आर्थिक स्थिति
ह्या वर्षी एप्रिल ते जून मालव्य योग असल्याने आर्थिक स्थिति उत्तम राहणार आहे. वेळे वर सगळ काही सांभाळायला तयार राहाल. जे काही आहे ते सुरक्षित ठेवण्या वर लक्ष्य द्यावे. जूनी येणि वसूल होतील व हया वर्षी हीच तुमची प्राथमिकता असली पाहिजे. मात्र दूसरा राहु असल्याने कोणावर ही विश्वास ठेवून चालणार नाही.
वैदिक उपचार
व्यसन , वाईट व चुकीच्या कार्या पासून दूर राहावे नाही तर नंतर पस्तावा होईल. कोणते ही खोटे धाडस करू नयेत. हनुमान चालीसा नियमित वाचावी आणि नेहमी सकारात्मक बनून राहावे. दररोज रामाच्या देवळात जावून प्रार्थना करावी किंवा हनुमानाच्या मंदिरात रामरक्षा स्त्रोत्र म्हणावे .
--डॉ. हितेश कारीया , नाशिक.
3) मिथुन राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला शनि आठव्या स्थानात भ्रमण, गुरु – सातव्या स्थानात आणि राहु 23 स्प्टेम्बर नन्तर वृषभ राशित राहणार आहे.
सामान्य कौटुंबिक जीवन
जानेवारी च्या महिन्या अखेरीस कौटुंबिक जीवनात थोडी शांती व स्थिरता येईल. व वर्षभर सामान्य राहील. कुटुंबातील लोकां बरोबर मिळून मिसळून व समजूतदारपणा ने राहाल ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल आणि त्यांची मदत देखील मिळेल. मे पासून ऑगस्ट महिन्या पर्यंत कोणाशी ही विरोधक म्हणुन वागु नयेत. आई च्या तबयतिकडे विशेष लक्ष्य द्यावें. सुंदर वैवाहिक जीवन :जीवनसाथी बरोबर असणाऱ्या संबंधात गाढ़ जवळकी व गोडवा पाहायला मिळेल. या वर्षी प्रेगनेंसी असल्यास जुळी संतती होण्याची संभावना ही आहे. वैवाहिक जीवन शांतपणे व चांगले व्यतीत होईल. मात्र केतुच्या महादशेचा सामना करत असणाऱ्या लोकां साठी वैवाहिक जीवनात थोड्या अडचणी येउ शकतात . प्रेम विवाह योग आहे व प्रेमी सोबत संबंध अजुन गाढ़ होतील.
आरोग्य संभाळा
व्यसने , असुरक्षित जेवण व सम्बन्ध अंगाशी येण्याची चिन्हें आहेत.रक्ताच्या कमतरतेमुळे अंगात असणाऱ्या अशक्तपणा व त्यामुळे आरोग्या बाबत मोठ्या अडचणी येऊ शकतात . व्यसनी लोकांना खानपान संबंधित तसेच यौन रोग होण्याची संभावना है। तस म्हणायला गेले तर आरोग्या साठी हे वर्ष वाइट च म्हणावे लागेल .एप्रिल ते जून छोटी मोठी इजा किंवा शस्त्रक्रिये ची शक्यता ही आहे. सावध राहावे.
उतुंग झेप घेईल कैरियर
शुक्र ,राहु व केतुच्या महादशेचा सामना करत असणाऱ्या लोकांना सोडलं तर बाकीचे लोक आपल्या केरियर मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करतील. बदल हवा असल्यास अजुन चांगली नोकरी मिळण्याची शक्यता ही आहे. प्रमोशन नक्की होऊ शकेल. मात्र जिद्द कायम ठेवित आपले ध्येय प्राप्त करण्या साठी परिश्रम करीत राहवे . विरोधक व प्रतिद्वंद्वी वाढतील परंतु तुम्हाला पुढे जायचं आहे हे लक्षात ठेवून आपली वाटचाल चालू ठेवावी , सफ़ळता निश्चित आहे. एप्रिल ते जून ह्या काळात शनिभ्रमण त्रासदायक ठरू शकते. मात्र सातव्या गुरु ची साथ भक्कम असल्याने सावरता येईल.
व्यापार तेजीत
2020 मधे मिथुन राशिच्या लोकांचा व्यापार स्थिर व चांगला राहणार आहे. उतुंग झेप घेत चांगला नफा होईल. कुठल्या नवीन राज्यात अथवा शहरात पार्टनरशिप मध्ये बिजनेस शुरू करू शकाल. आपल्या प्रतिस्पर्धीला मात देत मागे सोडाल. विरोध वाढेल व प्रतिद्वंदी या वेळी तुम्हाला परेशान करतील ही, मात्र त्यांच्या कड़े दुर्लक्ष करावे.
सबळ आर्थिक स्थिति
नौकरी व्यवसायात यश असल्याने मार्च नंतर तुम्ही थोडी फार बचत करून आपला बैंक बैलेंस वाढवणार. पैशाची गुंतवणूक करू शकता मात्र लोभ लालुच पोटी चुकी च्या ठिकाणी गुंतवणार नाही त्याची काळजी घ्या . याच्या आगोदर कुठल्या विशेषज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. तुम्हाला निवेशित केलेल्या पैशाचा लाभ निश्चित च होईल. सट्टा लॉटरी आदि मधे पैशे लावू नये नाहीतर मोठी आर्थिक हानि सम्भवते.
वैदिक उपचार
शनि किंवा राहु-केतु च्या महादशा असेल तर हनुमानाचे दर्शन घेत रोज़ नित्य पूजा पाठ करावे. इतरांनी आपली आस्था ठेवित देवता नामस्मरण करीत राहवे. गुरुुुवार, शनिवार उपवास करावा , मंदिर मधे सेवा द्यावी.
4) कर्क राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला शनि–मकर राशित सप्तम भाव मधे प्रवेश करेल , गुरु – 30 मार्च पासून सप्तम भाव मधे मकर राशित , 30 जून रोजी वक्री होऊन परत 20 नोवेम्बर रोजी मकरेत असेल , आणि राहु 2020 मध्ये मिथुन राशित असेल व स्प्टेम्बर मधे अकराव्या स्थानी वृषभ मधे स्थिरावेल.
सामान्य कौटुंबिक जीवन
या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन सामान्य असणार आहे . कुटुंबातील लोकांच्या विचारात सामंजस्य पाहायला मिळेल. सूर्याच्या राहु किंवा केतु अक्षांक्ष वर आल्या मुळे मतभेद होऊ शकतील तसेच कधी कधी थोड़े मानसिक तणाव देखील वाढतील.
वैवाहिक जीवन
सावधान रहा , तुमच्या वैवाहिक जीवना साठी हे वर्ष इतके चांगले नसेल. मार्च नंतर परिस्थितित सुधार होईल. मार्च ते मे व स्प्टेम्बर ते डिसेम्बर अति उत्तम असेल. तुमच्या वैवाहिक जीवना साठी ही वेळ थोडी कष्टदायक आहे. नात्यात गैरसमज/संशय उत्पन्न होतील. अशे देखील संभाव आहे कि, तुम्ही आपल्या जोडीदारा वर संशय घेत , या वेळी स्रियांचा गर्भपात होऊ शकतो.
आरोग्य
रक्ताशी सम्बंन्धित ईसोमनिया, रक्त विकार, हार्मोनल असंतुलन, बाहेर जेवणाची जास्त सवय असल्यास अपचन आणि फूड प्वाइज़निंग सारख्या समस्या उत्पन्न झाल्या मुळे तुम्ही त्रासात असाल. नेत्र व त्वचा संबंधी आजार होण्याची संभावना आहे. योग आदि करीत रहावे. मानसिक संतुलन संभाळावे व नशा पासून दूर राहवे.
कैरियर साठी उपयुक्त कालखंड
वेळे अनुसार तुमच्या आपल्या करियर मध्ये प्रगती होत जाईल, संधी मिळेल. चांगली नोकरी मिळेल किंवा नोकरीत बदलाव करण्याचे योग आहेत. नोकरीत चांगले प्रदर्शन करताल त्या मुळे दुसरी लोक तुमची ईर्षा करतील. नोकरी साठी कुठले लांबचे प्रवास करावे लागतील. कैरियर सेट करण्या साठी चांगली वेळ आहे. जानेवारी ते मार्च , मे ते जुलाई मधे विदेश यात्रा योग आहे.
व्यापार
चुकी च्या निर्णयाने व्यापारी वर्गाला या वर्षी नुकसान सोसावे लागतील. कुठल्या चुकीच्या प्रोजेक्ट मध्ये पैशाची गुंतवणूक करण्या बाबत विचार करु शकता . व्यापारात हुशार लोकांचा सल्ला घ्यावा व कसल्याही धोखेबाजी पासून आपली रक्षा करावी, सावध राहावे. पार्टनरशिप मध्ये काम असेल तर चांगले फळ प्राप्त होतील. जानेवारी ते स्प्टेम्बर योग अनुकूल आहेत तरी ही वर्ष सामंजस्यपणाने व हुशारी ने पसार करावे.
आर्थिक स्थिति
ह्या वर्षी तुमच्या आर्थिक स्थितित सुधार होण्याची संभावना आहे. तुमचा बैंक बैलेंस वाढू शकेल.पैशे कमवाल व त्या बरोबरच बचत देखील कराल. कोणालाही पैशे उसने-उधार देऊ नयेत. नाही तर त्रास वाढतील. कुठल्या चुकीच्या माणसा वर विश्वास ठेवल्या मुळे तुम्हाला नुकसान सोसावे लागु शकते. खुप सावधानी ने पाउल ठेवावे.
रोमेंटिक प्रेम जीवन
प्रेम ,अफ़ेयर , लग्ना साठी हे वर्ष खूप चांगले असणार. थोडे त्रास राहील पण ते नगण्य असतील. नवीन नाती जुळतील व जुनी नाती आणखी दृढ़ व मजबूत होतील. आद्यात्मिक व मानसिक कारणाने प्रेम अजुन घट्ट होईल. इच्छुकांचे लग्न जुळतील.
वैदिक उपचार
आध्यात्म व सदगुरूकृपा हवी च कारण ह्या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन आणि व्यापार सर्वात जास्त खराब होणार आहे त्या मुळे तुम्हाला समजदारीने काम घ्यायला पाहिजे. योग, ध्यान आणि प्राणायाम करावे.
शक्यतो रोज़ हनुमंताच्या देवळात जावे आणि शनिवारी तसेच मंगळवारी गरीबांना दान द्यावे. मां दुर्गा सप्तशतीच्या देवी कवचाचे पठन सतत करावे.
5) सिंह राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला शनि – मकर राशित, गुरु –30 मार्च पासून मकर राशित व 30 जून पासून पंचमात धनु मधे, आणि राहु कर्क राशित असेल व स्प्टेम्बर मधे दहाव्या स्थानी वृषभ मधे.
कौटुंबिक जीवन
ह्या वर्षी अयोग्य ग्रहमाना मुळे तुमच्या मार्गात अडचणी उत्पन्न होतील. कौटुंबिक जीवनावर देखील याची वाइट असर पाहायला मिळेल. वाद विवाद शांतपणे शमन करावे. एप्रिल ते जुलाई ग्रहमानाची साथ असल्याने शत्रुविजय प्राप्त होईल. परिस्थिति नियंत्रण महत्वपूर्ण ठरेल , नाहीतर मानसिक दृष्टया परिताप देऊन जाईल.
वैवाहिक जीवन
अवाक्यात असलेला थोड़ा त्रास सोडला तर ह्या वर्षी तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे . गरजेच्या वेळी तुमचा जोडीदार तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगेल व स्वतः ही समजून घेइन. .तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाणार . मार्च महिन्या नंतर थोडे फार त्रास होतील परंतु आपल्या बुद्धीनी तुम्ही यातून पार पडाल. एप्रिल ते जुलाई उत्तम राहिल. परिवरास जास्त वेळ देउ शकणार नाही.
आरोग्य
पाय, खांदा, नसा, आणि ह्रदया बाबत त्रास होण्याची संभावना आहे. त्या मुळे तुम्ही परेशान होऊ शक्ताल. मार्च महिन्या नंतर आणि मे 2020 च्या आगोदर जास्त पैशे सांभाळून ठेवावेत. चांगली औषध आणि व्यायाम जरूर करावा. व्यसन त्याग आवश्यक. तरी हे वर्ष आरोग्यास उत्तम आहे , योग व व्यायाम करू शकाल. मानसिक आरोग्य सुधारेल , वजन वाढू देउ नये.
केरियर
राहुची दशा किंवा राहुच्या नक्षत्रात महादशा चे स्वामी असेल तर तुम्हाला आपल्या करियर मध्ये त्वरित मोठी सफळता मिळेल. पंचम भाव तुमच्या करियर मध्ये अडचणी उत्पन्न करू शकेल. वर्तमानात सध्या असणारी नोकरी सोडावी लागू शकेल किंवा आपल्या कामात बदलाव करावा लागू शकेल. नोकरीत तणाव वाढेल. मूक पणे आपले काम चालू ठेवणे व वरिष्ठाशी वाद न घालणे हा एकमेव पर्याय . सिंह राशि जातकांना हे वर्ष उत्तम फलदायी आहे. नवीन जॉब अगर व्यवसाय यशदायी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी वर्ष चांगले आहे.
व्यापार संभाळा
व्यापार करण्या साठी ग्रहमान किंवा जास्त चांगली वेळ नाही. तुम्हाला आपल्या मना प्रमाणे आपल्या कष्टाच फळ मिळणार नाही. तुमच्या मुळे तुमच्या प्रतिद्वंदिला चांगला फायदा होणार आहे. प्रतिस्पर्धी मुळे तुम्हाला पैशाच नुकसान होणार आहे. कुठला चुकीचा निर्णय घेतल्या मुळे त्याचा पस्तावा तुम्हाला नंतर होईल. "सावधान" हा इशारा करीत असलेले ग्रहमान आहे. नवीन व्यवसायात यश मिळणार नाही.
आर्थिक स्थिति
मागील विचारपूर्वक केलेली गुंतवणूक मुळे लाभ व भक्कम आर्थिक परिस्थिति राहील . स्टॉक मार्केट पासून तुम्हाला धन लाभ होऊ शकेल. आर्थिक स्थिति उत्तम असेल. रियल एस्टेट मध्ये गुंतवणूक केल्या मुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल.
रोमांचकारी प्रेम जीवन
या वर्षी तुमचे प्रेमजीवन खूप उत्तम राहणार आहे. मार्च महिन्या नंतर थोडे सावध राहण्याची गरज आहे कारण या नंतर तुम्हा दोघां मध्ये गैरसमज आणि अत्याधिक रागाची भावना उत्पन्न होण्याची संभावना आहे. सपटेम्बर पासून परत सुख परतेल. एकन्दरीत प्रेमजीवन चांगले आहे. विवाह ठरेल.
वैदिक उपचार
नित्य पूजा पाठ व दोन वेळा आपल्या कुळ दैवताची आराधना करावी एवढे करणे तुमच्या साठी लाभकारी राहील. सद्गगुरू ची कृपा असणे गरजे चे भासेल. आदित्य हृदय स्तोत्र पठण , सूर्य अर्ध्य देणे हे उत्तम उपचार असेल.
6) कन्या राशिफल 2020
वर्ष 2020 च्या सुरुवातीला गुरु – मार्च मधे मकर राशित आणि राहु दशम भाव मधे असेल,
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक जीवन सामान्य राहील. दररोज कसल्या तरी अडचणी येतील. मिळकति साठी भावडां व आई वडील मधे मतभेद होतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नही , अष्टम स्थानी शुक्र असल्याने महिलां मधे बेबनाव , वर्षा अखेरिस हळू हळू सगळे काही व्यवस्थित होईल. त्या मुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. परिस्थिति लवकरच सामान्य होत जाईल.
प्रेम व वैवाहिक जीवन
गुरु आणि शनिच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकांचे वैवाहिक जीवन मानसिक तनावात राहिल. गुरु ग्रह आपला प्रभाव दर्शवणार आहे. मार्च ते स्प्टेम्बर वाद विवादपूर्ण ग्रहमान आहे . राहू आणि केतुच्या दशेत थोड्या अडचणी येतील. वैवाहिक जीवन सामंजस्यपणे हाताळा नाहीतर तुम्ही असफळ व्हाल त्या मुळे तुमचे मन अशांत व क्रोधित राहु शकते. वर्ष अखेरिस खुशहाल पारिवारिक जीवन नियमित होईल. वाणी संयम ठेवावा च. स्वतः पेक्षा मोठ्या मूली चे विवाह स्थळ येईल व लग्नास अनुकूल ग्रहमान आहे. प्रेम जीवन उत्तम राहिल . आपण आपल्या प्रेमी ला खुश करण्या साठी बरेच काही उद्योग करणार व ते सफ़ळ ही होईल. वैवाहिक अगर प्रेम जीवनात काही ग़ैरसमज असेल तरी ते ह्या वर्षी दूर होतील व परत खुशहाली येईल. लग्न जमेल.
आरोग्य
दमा , श्वासा बाबत थोडे त्रास होतील जास्त काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आरोग्यास मोठा धोका नाही. मात्र जमीन जायदाद च्या संदर्भात तणाव असल्याने मानसिक त्रास राहिल व अश्या वेळेस ड्राइविंग करू नयेत. त्वचा व नसां संबधी त्रास उद्भवल्यास त्वरित उपचार करावेत.
कैरियर जबरदस्त
करियर उतुंग झेप घेणार , अनुकूल घटना घड़तील . नोकरी सोडण्याची वेळ आली तरी ह्या वर्षाच्या मध्य काळात सोडू नये . स्थान परिवर्तन करण्याचे योग बनत आहेत. शहर बदलावे लागेल. वर्ष अखेरिस चांगली नोकरी मिळण्याची देखील प्रबळ संभावना आहे. सीनियर्सचा साथ मिळेल आणि आपल्या द्वारे केल्या गेलेल्या कष्टाच फळ मिळेल. टीम लीडर किंवा मेंटर बनण्याची संधी मिळेल. ऐकन्दरीत महत्वकांक्षी असाल तर चांगले फळ मिळेल. व्यापार चांगला राहिल. ग्रहमान साथ देणारे असून नवीन व्यवसायात यश आहे . मार्च पर्यंत व्यापारात सर्व काही उत्तम असेल व त्या नंतर ही सगळ काही व्यवस्थित होणार , खूप चांगले होणार आहे. केतु आणि शनिच्या दशेचा सामना करत असणाऱ्या लोकांना थोड सावध राहण्याची गरज आहे बाकी लोकां साठी हे वर्ष खूप चांगले असणार आहे. ह्या वर्षी कुठे ही नवीन गुंतवणूक करू नये. स्प्टेम्बर आर्थिक उन्नति घेऊन येईल. मागील गुंतवणूक चांगले परिणाम देणार आहे. या वर्षी तुमची आर्थिक स्थिति सामान्य राहणार आहे. पैशे मिळतील.
वैदिक उपचार
श्री कृष्ण भक्ति किंवा विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राच पठन करणे लाभकारी आहे. ध्यान करावे आणि सकाळी सैर करावी व सूर्यनारायण भगवानाचे दर्शन घ्यावे ,सगळ काही चांगले होईल. शनि स्तोत्र नियमित म्हणावे व गोसेवा जरूर करावी.
डॉ. हितेश कारीया
7) तूळ राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला शनि – तिसऱ्या स्थानी असणार आहे व 24 जानेवारी पासून चौथ्या स्थानी , गुरु – तिसऱ्या स्थानी व 30 मार्च पासून चौथ्या स्थानी स्थिरावेल. परत 30 जून ला वक्री होऊन तिसऱ्या स्थानी व शेवटी 30 नोवेम्बर रोजी चौथ्या स्थानी येऊन सरळमार्गी होऊन स्थिरावेल. राहु नवम स्थानी असेल व नोवेम्बर मधे अष्टम स्थानी प्रस्थापित होईल.
सामान्य कौटुंबिक जीवन
तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सामान्य राहील. कुटुंबात कुठला उत्सव किंवा समारोह साजरा केला जाईल जो शानदार व लाक्षणिक असेल. घरातील लोकां बरोबर कुठे फिरायला ही जाल. या वर्षी तुमच्या घरी पाहुण्यांचं येण-जाण चालू असेल.घरात लग्न किंवा लहान बाळाचा जन्म होऊ शकेल.
वैवाहिक जीवन शांतपणे जगा
मार्च नंतर तुमच्या शांत व चांगल्या व्यतीत होत असणाऱ्या वैवाहिक जीवनात खटराग पाहायला मिळेल. जोडीदाराचे आरोग्य खराब होउ शकते. कामा साठी बाहेर जाण्याची गरज भासू शकेल. त्या मुळे आपल्या जोडीदाराला जास्त वेळ देऊ शकणार नाही.
आरोग्य त्रासदायक नाही
या वर्षी आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची गरज नसेल . कमरेच्या खाली किंवा पायात थोड़ी दुखापत राहील. छातीत त्रास सम्भवतो.
कैरियर
एप्रिल ते स्प्टेम्बर मधे जॉब बदल सम्भवतो . शनि चौथ्या स्थानी असल्याने कठोर परिश्रम करणे भाग पडेल. नोवेम्बर नंतर पदोन्नति सम्भवते , तुमच्या करियर चा वेग वाढेल परंतु तुम्ही जास्त आनंदी राहु शकणार नाही. शेवटच्या क्षणी निराशा हाती लागेल. वेळे वर काम पूर्ण करू शकणार नाही. कार्य प्रदर्शन खराब होणार नाही त्या साठी दक्ष राहवे लागेल. कामात उशीर होण्याची संभावना आहे. तुम्हाला समजणार नाही कि तुमच्या जवळपास काय घटीत होत आहे. केतुची दशा असणाऱ्या लोकां साठी चांगली वेळ आहे. सहकर्मी बरोबर ताळमेळ बसणार नाही.
व्यापार जोरात
पार्टनर बरोबर तुमची समज चांगली असेल आणि दोघां मध्ये सगळे काही चांगले असेल. या वर्षी कुठले नवीन काम सुरु होईल. मार्च नंतर तुमच्या कामात तेजी येईल. कामात चांगली सफळता मिळेल. सेल्स किंवा मार्केटिंग मध्ये तुम्ही कुठले रेकॉर्ड तोडू शकता.
भक्कम आर्थिक स्थिति
या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. पैशा बाबत कसलीही काळजी करण्याची गरज नाही. नातेवाईक आणि मित्रांची मदत मिळेल. बैंक बैलेंस उत्तम राहणार आहे. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष तुमच्या साठी उत्तम असणार आहे. मात्र खोटे व फ़सवे जाहिराती बघून गुंतवणूक करु नयेत.
प्रेमळ प्रेम जीवन
प्रेमासाठी हे वर्ष उत्तम असणार. प्रेम संबंधात कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. सिंगल लोकांच्या जीवनात प्रेमाचे रंग भरले जातील. या नात्या मुळे तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण पाहायला मिळतील. वेगळ्या धर्मातील किंवा खालच्या जातीच्या व्यक्ती बरोबर संबंध बनू शकतील. मे ते स्प्टेम्बर मधे लग्न जुळेल व संतति योग आहे.
वैदिक उपचार
सकारात्मक विचार ठेवावेत आणि ध्यान करावे. मानसिक दृष्ट्या संतुलित राहावे. शांत पणे निर्णय घ्यावेत. शनिवारी शनीचे दर्शन घेऊन दान अर्चना करणे. गोसेवा व कन्या पूजन व भोजन खुप चांगले फळ देईन. मुंगयांना भोजन म्हणुन आटा-पीठ टाकावे.
8) वृश्चिक राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला शनि – तिसऱ्या स्थानात, गुरु – 30 मार्च पासून तिसऱ्या स्थानी व नंतर मे मधे वक्री होऊन जून मधे दुसऱ्या स्थानी राहून नोवेम्बर मधे परत तिसऱ्या स्थानी स्थिरावेल आणि राहु स्प्टेम्बर पर्यन्त अष्टम स्थानी राहून सप्तम स्थानी राहिल.
सुखी कौटुंबिक जीवन
तुमच्या लग्न भावात बसलेला गुरु पारिवारिक जीवनाला सुखमय बनवतो. या वर्षी तम्ही आपल्या जीवनातील किती तरी क्षण यादगार बनेल. मित्र तथा नातेवाईकां बरोबर कुठे फिरण्या साठी जाल. खूप खूप मौज-मस्ती कराल. लहान भावंडात व कुटुंबात सन्मान वाढेल.
सामान्य वैवाहिक जीवन
तुमचे वैवाहिक जीवन सामान्य राहणार आहे. जीवनसाथी आणि कुटुंबाची चांगली मदत मिळेल. जर तुमची बायको गरोदर असेल तर तुम्हाला या वर्षी पुत्र संतान होणाची संभावना प्रबळ आहे. तुमच्या जीवनात सगळे काही चांगले घटीत होईल. आपल्या जीवनसाथी बरोबर चांगली वेळ व्यतीत होईल. सगळे काही सकारात्मक असेल. मे जून मधे मामुली गोष्टी वरून नगण्य मतभेद होतील.
आरोग्य संभाळा
पोटा चे विकार सम्भवतात , तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. बाज़ारतील शीळी व तळलेल्या पदार्थांचे सेवन जास्त करू नयेत. जंक फूड खाऊ नये तर बाकी जास्त चिंता करण्याची गरज नाही. योग प्राणायाम , मॉर्निंग वॉक , ध्यान करावे.
कैरियर
तुमच्या करियर वर खूप सामान्य प्रभाव पडणार आहे. शेवटी वर्षाखेर प्रमोशन सम्भव आहे इतर वेळ तर तुमच्या साठी सामान्य वेळ आहे. प्रमोशन,कुठले नवीन काम मिळणे, नवीन नोकरी तसेच पगारात वाढ होण्याची संभावना विशेष नाही. कोणत्या ही प्रकारे मैनेजमेंट व वरिष्ठाशी वैर घेउ नये. नवीन जॉब साठी सध्या प्रयत्न करून ही समाधान मिळेल असे ग्रहमान नाहीत.
व्यापार उज्जवळ
बिजनेस साठी चांगली वेळ आहे. तुम्हाला कुठले नवीन काम मिळू शकेल. नवीन मित्र किंवा नवीन बिजनेस करण्याचे विचार तुमच्या मनात घोळत असतील. लोकांचा साथ मिळेल. राहु किंवा केतुची दशा असेल त्या लोकांना वाईट स्वप्न परेशान करतील अन्यथा हे वर्ष तुमच्या साठी शुभ असेल. नवीन व्यवसाय सुरु करावा यश मिळेल. उसनवार देउ नये , पैशे परत मिळणार नाही , कोणावर विश्वास ठेवू नये. धनसंचय होईल , ऋणमुक्त होउ शकता.
उत्तम आर्थिक स्थिति
या वर्षी तुमची आर्थिक स्थिति खूपच उत्तम राहणार आहे. बिजनेस मध्ये खूप पैशे कमवण्याची संधी मिळेल. तुम्ही पैसा-पाणी जपून ठेवताल. बैंक बैलेंस वाढेल पण हे लक्षात ठेवा कि तुम्हाला कुठल्या बॉन्ड किंवा अन्य जागी पैशाची गुंतवणूक करण्या आधी तज्ञ गुरुचा सल्ला घ्यावा. मित्र नातेवाईक आदिंना उसने पैशे देउ नये.
प्रेमात योग
में व जून मधे प्रेम संबंधा बाबत थोडे त्रास उत्पन्न होतील मात्र शांत राहूंन हाताळlवे. नवीन प्रेमी चा प्रवेश होईल , कुठले प्रेम संबंध लग्नाच्या बंधनात जखडले जातील. नवीन नाते जुळू शकेल. या वर्षी भरपूर प्रेम मिळेल. मार्च महिन्या नंतर तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळेल. ब्रेक अप झालेले प्रेम परत आयुष्यात येईल. एकंदरित यशमय अशे प्रेमजीवन आहे.
वैदिक उपचार
गुरु ची पुष्कराज नगाची अंगठी धारण करावी , गुरुची साथ असेल तर तुमची सगळी कामें होवू देईल. तुम्ही फक्त महिन्यातून एकदा गुरुवारी पंडित किंवा ब्राह्मणाला पिवळ्या रंगाचे वस्त्र दान , गाय ला चना डाळ व गुळ दान करावेत किंवा देवळाच्या बाहेर पाण्याची टाकी किंवा इतर स्वरुपात सेवा करावी. कुत्र्याला भाकर रोज देणे , नियमित विष्णु पूजन तुपाचा दिवा लाउन करावे.
9) धनु राशिफल 2020
सन 2019 च्या सुरुवातीपासून गुरु च्या पंचम भावा मुळे सर्वसुख संपन्न अशी ग्रहस्थिति आहे.
कौटुंबिक जीवन
हे वर्ष तुमच्या साठी नातेवाईकां कडून खूप त्रासाचे सिद्ध होणार आहे. तुम्हाला किती तरी प्रकारच्या त्रासांचा सामना करावा लागू शकेल. तुम्ही त्या अडचणीन वर तोड काढण्याचा भरपूर प्रयत्न कराल परंतु तरीही त्रास होतच राहतील. तुम्ही सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल परंतु त्याच्या उलट सगळ घडेल. मन शांत ठेवून आपले कार्य करीत राहावे.
मध्यम वैवाहिक जीवन
तुमचे वैवाहिक जीवन या वर्षी मध्यम असेल म्हणजे न जास्त चांगले किंवा न जास्त खराब. तुम्हाला या वर्षी एडजस्टमेंट आणि समजूतदार पणा ठेवायला पाहिजे. तेव्हाच तुम्हाला या वर्षी आपल्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण पाहायला मिळतील. तुम्हाला प्रोफेशनल क्षेत्रात असफळता मिळू शकेल ज्या मुळे तुम्ही थोड़े दुखी रहाल.
आरोग्य जपा
मानसिक तणाव राहणार आहे. डिप्रेशन आणि नकारात्मक विचारा पासून वाचण्या साठी किती तरी विविध बप्रकारच्या स्पोर्टिंग आणि क्रिएटिव एक्टिविटीज़ मध्ये भाग घ्यावा. मॉर्निंग वॉक , दयान , योग व जप खुप काही देऊन जाईल .
कैरियर
करियर साठी खुप चांगली वेळ आहे. किती तरी प्रकारची कामे लवकर पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताल , त्या देखील यशस्वी होत राहील. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी जुळलेली लोक चांगली काम करतील. इम्पोर्ट एक्सपोर्ट , पैशे , व्याज , लोन, बैंकिंग, फाइनेंस या क्षेत्राशी जुळलेल्या लोकांना देखील फायदा होईल. शनिदशामुक्ति बरोबर गुरु, राहुच्या उपस्थितित तुम्हाला हा लाभ मिळेल. मात्र केतुची दशा चालू असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे शुभ फळ मिळू शकणार नाही. सरकारी नौकरी चे योग प्रबळ आहेत. विद्यार्थी अभ्यासात लक्ष्य देउ शकणार नाही व परीक्षेत खुप मोठे यश अपेक्षित करू नयेत.
सामान्य व्यापार
मोठे स्वप्न बघू नये , खोटे पराक्रम करू नये . उपस्थित असणाऱ्या शुभ ग्रहां मुळे तुम्ही ज्या गोष्टीची ओढ करताल ती वस्तु तुम्हाला मिळू शकणार आहे. काही मोठे प्राप्त करण्याच्या फेरात तुम्ही चुका करू शकता. तुम्हाला हे समजायला पाहिजे कि तुम्ही एका रात्रीतच कुठली मोठी उपलब्धि मिळवू शकणार नाही. त्या साठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. लहान लहान प्रयत्न केले तर सफळता मिळू शकेल म्हणून धैर्य ठेवावे. ग्रहमान अनुकूल असल्याने शेवटी यश तुमचेच आहे.
आर्थिक स्थिति
आर्थिक स्थिति सुधरेल , बचत होईल , कर्ज़ फेडता येणार आहे. आपले नुकसान आणि चुकीच्या निर्णयाचे जबाबदार तुम्ही स्वतः असता. आपल्या ईगो मुळे तुम्ही आपले स्वतःचेच नुकसान करून घ्याल आणि पैशाचे देखील नुकसान कराल. थोडा फार फायदा होईल. कुठल्या ही प्रकारची पैशा बाबत संधी मिळाली तर ती सोडू नये. आपल्या द्वारे घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णया बाबत दोष आपल्या भाग्याला देऊ नये. मागील अडकलेले पैशे येण्यास सुरुवात होईल.
सामान्य प्रेम जीवन
या वर्षी तुमच्या रोमांटिक लाइफ मधून सगळे वाइट ग्रह कोसों दूर आहेत. जस चाललय तस चालून द्या. तुम्ही काही नवीन करण्याची ओढ करू शकता. अन्य ग्रहांच यात काही घेण-देण नाही. लग्नासाठी होकर देण्याची घाई करू नये. प्रेम जीवन रोमांटिक असेल.
वैदिक उपचार
सूर्य आराधना , सकाळी सूर्य दर्शन , दिवसातून दोन वेळा आदित्य ह्रदय स्तोत्र आणि कनकधरा स्तोत्राचे पठन करावे. शनिदेवाचे शास्त्रोक्त पूजन नियमित करावे.
10) मकर राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीपासून शनि चे गोचर मकर राशित अतिशय सुखदायक असणार , गुरु – 30 मार्च पासून मकर राशित व जून मधे धनु च्या बाराव्या स्थानी स्थिरावेल. परत नोवेम्बर मधे सरळमार्गी होऊन मकरेत प्रवेश करेल. राहु स्प्टेम्बर 2020 मध्ये सहाव्या स्थानी असेल व तदनंतर पाचव्या स्थानी येईल.
तनावपूर्ण कौटुंबिक जीवन
या वेळी कौटुंबिक जीवन चांगले व्यतीत होणार नाही. घरातील परिस्थिती पाहून तुम्ही तणावात रहाल. रोोजच्या कामा मुळे तुमची एनर्जी खालावत जाईल. परिस्थिति सुधारण्याचा प्रयत्न करताल परंतु काही फायदा होणार नाही. मतभेद, विवाद किंवा गैरसमज वाढतील. किती तरी वेळा तुम्हाला हे सगळ पाहून खूप वैताग येईल. आपला प्रयत्न सोडू नये. मार्च महिन्या नंतर परिस्थिति आणखीन जास्त खराब होईल. भावडांशी संबंध मधुर राहतील.
वैवाहिक जीवन सामान्य
या वर्षी वैवाहिक जीवन चांगले असेल. लहान लहान समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. गैरसमज दूर करू शकता.
आरोग्य सामान्य
पोट तसेच कंबर खाली , गुुडगे आदी चे त्रास होतील बाकी मोठा कुठला आजार होणार नाही त्या मुळे काळजी करण्याची गरज नाही.
शिक्षण व कैरियर
हे वर्ष शिक्षण व करियर साठी खूप चांगले नसणार. सुरूवातीस जरी चांगले परिणाम दिसत असतील तरी , मार्च महिन्या नंतर परिस्थिति आणखी ज्यादा खराब होईल. किती ही प्रयत्न केले तरी हाती काही लागणार नाही. नोकरी बदलण्याचा खूप प्रयत्न कराल परंतु त्यात विफळ व्हाल. नाव आणि पैसा दोन्ही ही खराब होतील. तुमचे सीनियर्स देखील तुम्हाला पसंद करणार नाहीत. शांत रहावे व पुढे चांगले ग्रहमान येतील च त्यासाठी धैर्य ठेवून पुढे चालत रहावे.
व्यापार
गोचरचा अशुभ प्रभाव तुमच्या व्यापारा वर पडेल. नुकसान सोसावे लागेल.कामात विना कारण विलंब होईल. लाच देवूनही तुमच्या सरकारी कामात अडचणी येतील व तुमची काम होणार नाहीत. तुम्ही आपला बिजनेस वाढवण्या विषयी किंवा भागीदारी विषयी विचार कराल पण त्यात देखील तुम्हाला सफळता मिळणार नाही. जमीन जायदाद अप्रैल नंतर चांगले फळ देईल.
आर्थिक स्थिति
आर्थिक स्थिती जास्त चांगली राहणार नाही. खर्चात वाढ होईल. या वर्षी नफा कमी होईल. आपली पॉलिसी किंवा फिक्ड् डिपॉजिट तोड़ू नयेत. पुढे येणाऱ्या वेळी ते तुमच्या कामे येतील. या वर्षी तुमच्या समोर किती तरी पैशा च्या समस्या येतील.
प्रेम जीवन आनंदित
वर्ष 2020 मध्ये तुमचा प्रेम संबंध चांगला असेल. जास्त वीचार व राजकारण केेले तर प्रेमजीवन कष्टमय होईल . स्त्रिमित्र समोरून चालत आयुष्यात प्रवेश घेईल मात्र पुढे तापदायक ठरू शकते व खर्च वाढतील
वैदिक उपचार
दररोज हनुमंताच दर्शन करण्या साठी देवळात जावे. आपल्या सुखा साठी प्रार्थना करावी. हनुमानाच्या फोटो समोर दिवा लाावून रामरक्षा स्तोत्र वाचावे. आई वडिलांचे दर्शन व आशीर्वाद घेत रहावे , सेवा करावी. कुलदैवी समोर दुर्गा सप्तशती चे वांचन करून आराधना करावी.
11) कुम्भ राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीपासून च शनि – मकर राशिच्या बाराव्या स्थानी असेल व वर्षभर तेथे च असणार. म्हणजे च खुप यात्रा , थकवा , मानसिक परिताप आदि संभवतो.
कौटुंबिक जीवन
हे वर्ष तुमच्या साठी उत्तम असेल. कौटुंबिक जीवन सामान्य असेल.कुटुंबात कुठला क्षण असा येईल जो कधी ही आपण विसरू शकणार नाही. नातेवाईक घरी येतील. त्याच येण जाण चालू असेल. कौटुम्बिक जुने मिळकतीचे विवाद संपतिल व नाते परत सुरळीत होईल.
वैवाहिक जीवन
व्यवसायिक कामा साठी कुटुंबा पासून दूर राहवे लागेल . वैवाहिक जीवनात कसले ही मोठे त्रास उत्पन्न होणार नाहीत. मार्च नंतर परिस्थिति आणखी चांगली होईल. जीवनसाथीचा मन वांछित सहयोग मिळेल , स्थिती सामान्य असेल. सावधान - तुम्ही बाहेर अनैतिक संबंध बनवू शकता.
आरोग्य संभाळl
ह्या वर्षी यात्रा खुप होणार आहे ,खाणे पिणे स्वच्छ व चांगले असावे. पोटाचे विकार होउ शकता, वजनावर वर लक्ष द्यावे. जुने आजार डोके वर काढतील. आपले औषधि आदि नेहमी सोबत ठेवावे.
कैरियर
या वर्ष अखेरिस तुमची प्रोफेशनल लाइफ खूप उत्तम राहणार आहे. तुम्हाला किती तरी नवीन अवसर मिळतील. तुमच्या करियर साठी खूप छान वेळ आहे. तुम्ही आपल्या क्षेत्रात आपले नाव रोशन कराल. अवार्ड मिळेल. मात्र वर्षारंभी एका मागे एक चेलेंज येत राहतील व मानसिक परिताप देत राहिल. कसे ही करून थोड़े महीने शांतपणे काढ़ावेत.
व्यापार
व्यापारा साठी चांगली वेळ नाही. व्यापारी वर्गाला चांगली सेल व डील मिळू शकनार नाही. भरपूर पैशे कमवाल पण शेवटी हाती काहीच उरणार नाही. पुढे चांगला नफा होईल. कुठली मोठी डील करू शकता. कुठल्या नवीन जागी किंवा देशात आपला व्यापार वाढवू शकता . पार्टनरशिप मध्ये काम करण्याचे योग आहेत तरी ही खोटी रिस्क घेऊन काम करू नयेत. लक्षात ठेवा ह्यवर्षी तुमच्या राशिस्थानी राहु विराजमान आहेत व मोठी हानि सम्भवते.
आर्थिक स्थिति
या वर्षी आर्थिक स्थिति सामान्य असेल व बचत देखील थोडिशी होईल. बैंक बैलैंस वाढेल. स्टॉक किंवा गोल्ड मध्ये निवेश करू शकता व या पासून पुढे खूप पैसा कमवाल. सट्टा लावू नये , पैशे गमवाल. लॉटरी , शेयर्स पासून लांब रहावे. मोठी हानि होईल असे काही ही करू नयेत.
प्रेमजीवन
ग़ैरसमज वाढेल , संशय उत्पन्न झाल्या मुळे प्रेमा चे नाते तुटण्याची संभावना आहे. कुठल्या विधवा किंवा तलाकशुदा महिला बरोबर शरीरिक संबंध बनू शकतील. लग्न जमेल.
वैदिक उपचार
आपल्या कुळ दैवताची पूजा करावी. दररोज सकाळी 20 मिनट ध्यान आणि प्राणायाम जरूर करावे. डोके शांत ठेवा. आस्तिक रहा. गोसेवा करावी , सोमवारी शिवलिंग पूजन व दुग्धाभिषेक करावा.
12) मीन राशिफल 2020
सन 2020 च्या सुरुवातीला शनि – अतिशुभ अकराव्या स्थानी , गुरु – दशम स्थानी असून 30 मार्च पासून मकरेत अकराव्या स्थानी राहिल.
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक सुख , वाद विवादाने व आरोप प्रत्यारोपपूर्ण वर्ष असल्याने प्राप्त होणार नाही. या वर्षी घर शिफ्ट करू शकता, किंवा भाड्याच्या घरात देखील जावू शकता. विशेष काही महत्वपूर्ण घडणार नाही. नवीन मिळकतीचे खरीदी चे योग आहेत पण तेच विवादाचे कारण ही होउ शकते.
वैवाहिक जीवन
वैवाहिक जीवन सामान्य व्यतीत होईल आणि मार्च महिन्या नंतर वैवाहिक सुखात आणखी वृद्धि होइल. आपल्या जीवनसाथी बरोबर वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. लहान लहान तक्रारी होतील परंतु अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. जोडीदारा बरोबर कुठे फिरायला जाल.
आरोग्य सामान्य
आरोग्या बाबत जास्त काळजी करण्याची खुप गरज आहे तरी मार्च ते मे महिन्या मध्ये आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कुठले गंभीर हॄदय विषयी किंवा श्वासा संबंधी छोटे छोटे त्रास होऊ शकतील. पोटाचे विकार , अल्सर आदि होऊ शकतात. प्रवासात जास्त काळजी घ्यावी
कैरियर उत्तम
अकरावा शनि उत्तम फळ देणार आहे. करियर साठी उत्तम वेळ आहे. मार्च नंतर चांगले अवसर प्राप्त होतील. करियर मध्ये प्रगति होईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल व पदोन्नति होईल. विदेश यात्रा योग आहे , करियर मध्ये वाढ होईल. एकन्दर हे वर्ष सर्व सुख देऊन जाईल. विद्यार्थ्यांसाठी यश मिळेल असे ग्रहमान आहेत. विदेशात एडमिशन मिळेल व विद्याभ्यास यशस्वीपणे पूर्ण होईल.
व्यापार सामान्य
व्यापाराच्या क्षेत्रात मिळते जुळते फळ प्राप्त होतील. या वर्षी तुमच्या द्वारे ज्या योजना आखल्या जातील त्यातील काही योजना सफळ होतील. तुम्ही जशी आशा करताल त्या प्रमाणे होणार नाही. पैशाची टंचाई भासेल तरी मार्ग सापडतील. नौकरी सोडून स्वतः चे व्यवसाय करण्यास ग्रहमान योग्य आहेत. यशप्राप्ति होईल.
आर्थिक स्थिति
मार्च नंतर तुमची आर्थिक स्थिति आणखी जास्त मजबूत होण्याची सुरुवात होईल. व्यापारात पैशे कमवण्याची संधी मिळेल. सोने , फाइनेंस आणि प्रॉपर्टी दोन्हीत ही पैशे कमवण्याची संधी मिळेल.कुठले ही काम शांतीपूर्वक करावे जास्त घाई करू नये व आपल्या पैशाला बर्बाद करू नये. ऑफिस किंवा घर भाडया वर देऊन उतपन्न वाढवू शकता.
सामान्य प्रेमजीवन
या वर्षी तुमच्या रोमांटिक लाइफ वर ज्यादा असर पडणार नाही. प्रेमा साठी खूप चांगली वेळ चालू आहे. कुठल्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. मार्च पर्यंत लहान लहान समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. प्रेमी सोबत विदेश यात्रा योग सुद्धा आहे. प्रेम जीवना कड़े लक्ष देता देता परिवारात दुर्लक्ष किंवा ग़ैरसमज होणार नाही त्याची काळजी घ्यावी.
वैदिक उपचार
सात्विक जीवन आणि सकारात्मक विचार ठेवावेत अस केल तर या वर्षी कुठले त्रास उत्पन्न होणार नाहीत. नित्य पूजा पाठ अखंड करीत रहावे. सुपात्र ब्राह्मण भोजन , गोसेवा , तुलसी पूजन व गायत्री मंत्र पठण शुभफलदायी ठरेल.
--शुभम् भवंतु---
--Hitesh Karia , Nashik
---समाप्त---
Wednesday 17 April 2019
मंगळ दोष माहिती
मंगळ दोष आणि त्यावरील उपाय !!!
मित्रानो आपण बर्याच वेळा मंगळाची पत्रिका किंवा मांगलिक पत्रिका असे शब्दोच्चार ऐकतो. तर आज आपण या मांगलिक दोषावरची शास्त्र शुद्ध माहिती पाहणार आहोत. सर्व प्रथम आपण या मंगळाचे स्वभाव विशेष पाहूयात म्हणजे तुम्हाला या संपूर्ण विषयाची लगेच कल्पना येईल.
ज्या लोकांना मंगळ दोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी , भांडकुदळ असतो. हे लोक लवकर राग येणारे नि रागाच्या भरात हातून गैर कृत्य घडणारे असतात. यांना राग जसा लवकर येतो तसा तो लगेच जातोही. एक घाव दोन तुकडे करणारा यांचा स्वभाव असतो. छोट्या छोट्या गोष्टी वरून लगेच चिडणारे. खुनशीपणा यांच्या अंगी असतो. तसेच रागाच्या भरात जोरात गाडी चालवणारे लोक हे फक्त मंगळाचेच असतात. तसेच जीवनात कोणत्याही कामास लागणारे धाडस या लोकां मध्ये असते. तसेच अचूक निर्णय क्षमता, जलद क्षणार्धात निर्णय घेणारे आणि एकदा निर्णय घेतला कि परत माघे न वळणारे मग तो निर्णय चूक असो किंवा बरोबर असो हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. प्रभाव शाली झुंझार व्यक्तिमत्व हि या लोकांना मिळालेली निसर्गाची देणगी असते. तसेच जीवनात आलेल्या कोणत्याही वाईट प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची ताकद या मंगळाच्या लोकां मध्ये असते. मसालेदार खाणारे तसेच आवडत्या व्यक्ती साठी खर्च करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. हे लोक मुद्दामहून काही तरी खुसपट काढून भांडणे करणारे असतात. तसेच दुसर्याला तोडून बोलणे टोचून बोलणे आणि एखाद्या गोष्टीला लगेच प्रतिसाद देणारे असतात. एखाद्या गोष्टी बद्दल जास्त विचार न करता अविचाराने कृती करणारे असतात. म्हणून हे लोक प्रेमात देखील लगेच पडतात. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या साठी वाट्टेल ते दीव्य करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच ज्याच्या वर प्रेम करतात त्याचा बदला घ्यायला सुद्धा हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. थोडक्यात काय तर....." भले (नीट वागनार्याशी) तरी देऊ कासेची ( कमरेची) लंगोटी ! नाठाळाचे माथी हाणू काठी !! या संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे वागणारे हे लोक वागतात.
मांगलिक व्यक्तींचा सेक्शुअली दृष्ट्या स्वभाव कसा असतो हे आता आपण पाहूयात.
या लोकां मध्ये कामवासना खूप प्रबळ प्रमाणात असते. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि नि:संशय ती व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असते. पण याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही.
आत्ता पर्यंत आपण मांगलिक व्यक्तीचे स्वभाव पहिले आता सर्व प्रथम पत्रिकेतील मंगळ दोष म्हणजे काय हे आपण पाहूयात.
पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी ( तनु स्थानी ), चतुर्थ स्थानी ( सुख स्थानी) , सप्तम स्थानी ( विवाह स्थानी ) , अष्टम स्थानी ( मृत्यू स्थानी ) आणि द्वादश स्थानात ( शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. आकृतीत दाखवलेल्या १, ४, ७, ८, १२ या स्थानात ( घरात ) जर मंगळ ग्रह असेल तर त्या पत्रिकेत मंगळदोष आहे असे मानले जाते. किंवा ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते. मंगळ स्वताच्या ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून ४,७,८ या स्थानावर दृष्टी टाकतो. मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो. तर १, ४, ७, ८, १२ या घरात मंगळ असता तो व्यक्तीच्या जीवनावर असे काय परिणाम करतो हे आपण आता पाहूयात !
१) प्रथम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत चौथ्या स्थानी (सुख स्थानी), सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ) आणि आठव्या ( मृत्यू ) स्थानावर दृष्टी टाकतो. या मुळे अशा व्यक्तींच्या जीवनात स्वताला अपघात, कुटुंबात कलह , वैवाहिक जोडीदाराशी मत भेद अशा गोष्टी दिसून येतात. व स्वताच्या तप्त स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुषित असते. जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टीवरून काही तरी खुसपट काढून भांडणे काढण्याच्या सवई मुळे तसेच जोडीदाराचे सतत दोष दाखवण्याच्या स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुखी असते. यांची तामसिक प्रवृत्ती दांपत्य जीवन व घर दोघांना प्रभावित करते. बहुतेक करून ह्या लोकांना मैदानी खेळाची आवड असते.
२) चतुर्थ स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ), दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , आणि अकराव्या स्थानी ( लाभ स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना विवाहा नंतर नोकरी व्यवसायात अडचणी, आर्थिक विवंचना यांचा सामना करावा लागतो. व त्या मुळे वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतात. या स्थानातला मंगळ व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडवतो व स्वताच्या आईच्या तापट स्वभावा मुळे हा मंगळ दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो. स्वताच्या मनाविरुद्ध आईच्या पसंतीच्या मुलीशी विवाह करावा लागतो. बहुतेक करून या लोकांच्या शिक्षणात अडचणी किंवा अडथळे दिसून येतात.
३) सप्तम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , प्रथम स्थानी ( तनु स्थानी ) व द्वितीय स्थानी ( धन स्थानी ) दृष्टी टाकतो. त्या मुळे या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक विवंचना कायम असतात. तसेच कुटुंबात कायम कलह चालू असतात. येथे वैवाहिक जोडीदार तापट स्वभावाचा व भांडकुदळ मिळतो व या जोडीदाराच्या तापट स्वभावा मुळे दांपत्य जीवनात बाधा निर्माण होते. जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. बहुतेक करून या लोकांच्या नोकरी व्यवसायात अडचणी दिसून येतात. धन लाभ होत नाहीत आर्थिक चिंता कायम सतावत असते.
४) अष्टम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ अकराव्या स्थानी (लाभ स्थानी), दुसर्या स्थानी ( धन स्थानी) आणि तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या जीवनात प्रवासात चोरी, अपघात,चोरा पासून भय दिसून येते. तसेच सासुर वाडीशी वाद असल्या मुळे हे लोक बायकोस माहेरी पाठवत नाहीत. तसेच यात व्यक्ती स्वताच्या बेजबाबदार वागण्या मुळे सुखांना पारखा होतो आणि स्वताचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य कमी करतो. बहुतेक करून या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. स्त्रियांच्या कुंडलीत हा दोष जोडीदाराचे आकस्मित निधन दाखवतो. साधारण पणे अग्नी पासून जीवितास धोका दिसून येतो.
५) द्वादश स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ), सहाव्या स्थानावर ( रोग स्थानी ) आणि सप्तम स्थानी ( विवाह स्थानी) दृष्टी टाकतो. त्या मुळे विवाहा नंतर पाठीवरच्या भावंडाच्या बाबतीत अशुभ फळे मिळतात. पाठीवरच्या भावंडाचा अपघात किंवा त्यासम वाईट गोष्टी घडतात. शैय्या सुख स्थानी असलेला हा मंगळ लैंगिक सुखातून वादविवाद निर्माण करतो. विवाहा नंतर आजारपण किंवा अपघात संभवतो. या स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. बहुतेक करून या स्थानातील मंगळ हा व्यक्तीला कामांध किंवा कामपिपासू बनवतो व शरीर सुखा साठी व्यक्तीला पाप कर्मे करायला प्रवृत्त करतो. म्हणून या स्थानातील मंगळ व्यक्तीस कामांध पणामुळे स्वताच्या दुखास कारणीभूत होत्तो.
मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...
१) मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
२) मंगळ कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे) असेल तर.
३) मंगळ उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
४) पत्रिकेत शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
५) पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.
६) मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही.
सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे. मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.
मंगळ दोषावर उपाय :-
१) गणेशाची उपासना करणे.
२) हनुमानाची उपासना करणे.
३) दुर्गा मातेची उपासना करणे.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतावर सय्यम ठेवणे व त्या साठी रोज सकाळी १० मिनिटे व रात्री झोपताना १० मिनिटे या लोकांनी ध्यानाची सवय लावून घेतली पाहिजे.
मित्रानो या मंगळ दोषावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे परंतु हा लेख खूप मोठा झाल्याने आता लिखाण आवरते घेतो. तरी यातून आपणास बरीच माहिती मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया तसेच आपले या बाबतीतले अनुभव आपण मला कळवावेत व हि माहिती आपल्या मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती.
संदर्भ:- श्री. सचिन खुटवड सर