Saturday 4 February 2017

Insulin details

*🌻इंसुलिन कसे काम करते? 🌻*

आपल्या शरीरातील स्वादुपिंड(pancreas) नावाच्या ग्रंथीमधून इंसुलिन  हे हार्मोन स्त्रावले जाते/ सिक्रीट होते. इंसुलिन  सिक्रिशन हे मुख्यतः दोन प्रकाराने होते.
1- बेसलाइन सिक्रीशन हे प्रतिदिन 18-32 युनिट्स असते. ते जगण्यासाठी आवश्यक असते .आपण ते थांबवू शकत नाही .
2- आपण दरवेळेस काहीही खाल्ले की इंसुलिन स्त्रावते/सिक्रीट होते .

   आपण जे विविध अन्नपदार्थ खातो त्या सगळ्याचे रूपांतर शेवटी तीन गोष्टीत होते -   जसे कार्बोहायड्रेट्सचे ग्लूकोज मध्ये,प्रोटीन्सचे (प्रथिनांचे) अमायनो ॲसिड्स मध्ये आणि तेल - तुपाचे फॅटी ॲसिड्स मध्ये.
    आपले शरीर हे छोट्या छोट्या   पेशिंनी  बनलेले आहे. प्रत्येक पेशीला त्यांचे कार्य करण्याकरता ऊर्जा लागते. त्या करता मुख्यतः ग्लूकोज आणि फॅटी ॲसिड्स वापरले जातात.  मेंदूतील पेशी ऊर्जेसाठी फक्त ग्लूकोजचा वापर करतात.

   आपल्या जेवणाचे पचन झाल्यावर हे तीन पदार्थ आपल्या रक्तामध्ये येतात. प्रत्येक पेशीला ग्लूकोजची गरज असते..... पण ग्लूकोज स्वतःहून पेशीमध्ये प्रवेश करू शकत नाही. पेशी या कुलुपबंद असतात.(ज्याला मेडिकल भाषेमध्ये insulin receptor असे म्हणतात) हे कुलुप उघडण्याचे काम इंसुलिन करते . इंसुलिनने हे कुलुप उघडल्यावर ,ग्लूकोजचा त्या पेशीमध्ये  
प्रवेश होतो आणि त्या पेशिला ऊर्जा मिळू शकते. याला अपवाद फक्त मेंदूतील पेशींचा - ते इंसुलीनच्या शिवाय ऊर्जेसाठी ग्लूकोजचा वापर करू शकतात.
   पेशींची गरज भागल्यावर सुद्धा जर रक्तातील ग्लूकोजची पातळी जास्त असली तर इंसुलिन त्याचे रुपांतर ग्लायकोजेन मध्ये करते .(ग्लूकोजचा साठा या रूपात असतो )
100gm- यकृतात (लिव्हर)
500gm- स्नायूंमध्ये(मसल्स )
जर आणखी जास्त ग्लूकोज असेल तर इंन्सुलीन त्याचे रूपांतर यकृतात फॅटी ॲसिड्स मध्ये  करते आणि आपल्या शरीरात चरबीच्या रुपात त्याचा साठा होतो . इंन्सुलीन अमायनो ॲसिड्सचे रुपांतर आपल्या शरीराला लागणाऱ्या विविध प्रथिनांमध्ये करते  आणि फॅटी ॲसिड्सचे चरबी मध्ये आणि आपल्या शरीरात त्याचा संचय होतो. तुमच्या लक्षात आलेच असेल की इंसुलिन  हे ऊर्जेची साठवण करणारे  ,बचत करणारे हार्मोन आहे.
जेव्हा रक्तातील इंसुलिनची पातळी वाढलेली असते,तेव्हा ऊर्जेसाठी शरीर ग्लूकोजचा वापर करते आणि इंसुलिनची पातळी घटते तेव्हा शरीर फॅटी ॲसिड्सचा ऊर्जेसाठी उपयोग करते.  म्हणून वजन कमी करण्यासाठी रक्तातील इंसुलिनची पातळी कमी करणे आवश्यक आहे. जे केवळ खाण्याची वारंवारिता कमी करण्याने शक्य आहे. म्हणूनच आम्ही दिवसातून दोन वेळा खावे असे सुचवतो .
   इंसुलिनची अतिजास्त पातळी - इंसुलिन  रेसीसटंसला जन्म देते. (insulin resistance).यामध्ये इंसुलिन आपले कार्य करू शकत नाही. पुढे त्याचे प्रत्यंतर मधुमेहामध्ये (डायबेटिस) होते .

*( मराठी भाषांतर: डॉ.स्वाती उनकुले)*

No comments:

Post a Comment