Friday 27 January 2017

Weight loss technique

*विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंधाचा सोपा उपाय*

*तत्त्व:*

*डॉक्टर दीक्षित/जिचकार* सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

*परिणाम: *

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही *(मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)*

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात.  प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता. 

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

      अ) पातळ ताक  (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

      ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा *(शुगर फ्री, मध, गुळदेखील नको)*; ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल  

      क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

      ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई  खाऊ नका)

      इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १) 

      ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही *(आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)*  

४)  एकदा जेवणाच्या  वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले  तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा. 

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)  

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

     अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.  

     ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

     क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी *(fasting insulin level)* तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा. 

      ड)  पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी *(HbA1C)* तपासून घ्या. ही तपासणी दर तीन  महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
आणि मधुमेह मुक्त     भारत"   अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने  खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते 

२) पोटाचा घेर कमी होतो 

३) एचबीएवनसी  (HbA1C) कमी होते 

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते

** म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा.

No comments:

Post a Comment