Showing posts with label मराठी medical post. Show all posts
Showing posts with label मराठी medical post. Show all posts

Friday, 27 January 2017

Weight loss technique

*विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंधाचा सोपा उपाय*

*तत्त्व:*

*डॉक्टर दीक्षित/जिचकार* सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

*परिणाम: *

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही *(मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)*

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात.  प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता. 

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

      अ) पातळ ताक  (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

      ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा *(शुगर फ्री, मध, गुळदेखील नको)*; ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल  

      क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

      ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई  खाऊ नका)

      इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १) 

      ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही *(आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)*  

४)  एकदा जेवणाच्या  वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले  तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा. 

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)  

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

     अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.  

     ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

     क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी *(fasting insulin level)* तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा. 

      ड)  पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी *(HbA1C)* तपासून घ्या. ही तपासणी दर तीन  महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
आणि मधुमेह मुक्त     भारत"   अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने  खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते 

२) पोटाचा घेर कमी होतो 

३) एचबीएवनसी  (HbA1C) कमी होते 

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते

** म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा.

Monday, 31 October 2016

Medical Bulletin: vitamin Marathi

SCIENCE विटामिन संबंधी महत्वपूर्ण तथ्य:-
========================
*√विटामिन - 'A'*
√रासायनिक नाम : रेटिनाॅल
√कमी से रोग: रतौंधी
√स्रोत (Source): गाजर, दूध, अण्डा, फल.
*√विटामिन - 'B1'*
√रासायनिक नाम: थायमिन
√कमी से रोग: बेरी-बेरी
√स्त्रोत (Source): मुंगफली, आलू, सब्जीयाँ
*√विटामिन - 'B2'*
√रासायनिक नाम: राइबोफ्लेबिन
√कमी से रोग: त्वचा फटना, आँख का रोग
√स्रोत (Source): अण्डा, दूध, हरी सब्जियाँ
*√विटामिन - 'B3'*
रासायनिक नाम: पैण्टोथेनिक अम्ल
√कमी से रोग: पैरों में जलन, बाल सफेद
√स्रोत (Source): मांस, दूध, टमाटर, मूंगफली
*√विटामिन - 'B5'*
√रासायनिक नाम: निकोटिनेमाइड (नियासिन)
√कमी से रोग: मासिक विकार (पेलाग्रा)
√स्रोत (Source): मांस, मूंगफली, आलू
*√विटामिन - 'B6'*
√रासायनिक नाम: पाइरीडाॅक्सिन
√कमी से रोग: एनीमिया, त्वचा रोग
√स्रोत (Source): दूध, मांस, सब्जी
*√विटामिन - 'H / B7'*
√रासायनिक नाम: बायोटिन
√कमी से रोग: बालों का गिरना , चर्म रोग
√स्रोत (Source): यीस्ट, गेहूँ, अण्डा
*√विटामिन - 'B12'*
√रासायनिक नाम: सायनोकोबालमिन
√कमी से रोग: एनीमिया, पाण्डू रोग
√स्रोत (Source): मांस, कजेली, दूध
*√विटामिन - 'C'*
√रासायनिक नाम: एस्कार्बिक एसिड
√कमी से रोग: स्कर्वी, मसूड़ों का फुलना
√स्रोत (Source): आँवला, नींबू, संतरा, नारंगी
*√विटामिन - 'D'*
√रासायनिक नाम: कैल्सिफेराॅल
√कमी से रोग: रिकेट्स
√स्रोत (Source): सूर्य का प्रकाश, दूध, अण्डा
*√विटामिन - 'E'*
√रासायनिक नाम: टेकोफेराॅल
√कमी से रोग: जनन शक्ति का कम होना
√स्रोत (Source): हरी सब्जी, मक्खन, दूध
*√विटामिन - 'K'*
√रासायनिक नाम: फिलोक्वीनाॅन
√कमी से रोग: रक्त का थक्का न बनना
√स्रोत (Source): टमाटर, हरी सब्जियाँ, दूध

Tuesday, 20 September 2016

मुलाक्षर व रोग उपचार मराठी

"मुळाक्षरे आणि आरोग्य" थोडक्यात "वर्ड व्हायब्रेशन थेरपी".

[लेखाला ग्रंथाधार, शास्त्राधार आहे की नाही मला माहीत नाही. ज्या अभ्यासूंना ग्रंथाधाराची गरज वाटते त्यांनी ग्रंथ शोधावेत मला विचारू नये. माझे काम अनुभव घेणे व फायदा झाला तर इतरांना सांगणे हे आहे.]

आपल्या शरीरात सात (मुख्य) चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे, एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हायब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो आणि आपले आरोग्य सुधारते.

षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. !रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं, शं,षं सं  / बं, भं, मं, यं, रं, लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली. आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.

लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसऱ्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.

मी सातारला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागल्या आणि  दुखणे थांबले. त्यांनी माझ्या मुलीला (मुलगी सातारला असते) फोन करून हा अनुभव सांगितला.

एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता.डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’

डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो 'कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो 'तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा!' मी सोमवारी औषधे पाठवली. ती गुरुवारी पत्ता सापडत नाही म्हणून परत आली. गुरुवारी रात्री डोम्बिवालीहून फोन आला. ‘औषधे मिळाली नाहीत पण अक्षरे म्हणून फायदा झाला.'

सातारच्या एका आजींनी (वय ७२) त्यांचे बरेच त्रास सांगितले. त्यांना बीपी, बद्धकोष्टता,  अशक्तपणा, मधेच अस्वस्थ होणे वगैरे अनेक त्रास होते. बरेच डॉक्टर झालेहोते. मी म्हटले तुम्ही पुण्याला आल्यावर मला भेटा म्हणजे मी काही औषधे देऊ शकेन फोन वरून कसे काय काही देता येणार? त्यावर त्या म्हणाल्या, 'अहो मी घरातून रिक्षापर्यंत नाही जाऊ शकत तर पुण्याला कसली येते?' मी त्यांना शिवांबू घेण्यास सुचविले. परंतु त्यांची तयारी नव्हती. मग मी त्यांना मराठीतील अक्षरे अनुस्वार देऊन कशी म्हणायची हे फोनवरच सांगितले. त्यांनी दररोज १०० वेळा ही अक्षरे म्हणायला सुरवात केली. एक महिन्यांनी दररोज दोन वेळा पुढील महिन्यात रोज तीन वेळा म्हणायला लागल्यानंतर त्यांचे फोन येणे बंद झाले.

सहा महिन्यानंतर माझ्या ऑफिसवर एक आजी मला भेटायला आल्या. म्हणाल्या, 'माझे नाव दाते. मी सातारहून आले आहे.' मला आश्चर्य वाटले. पुढे म्हणाल्या, 'मला फोन वरून सल्ला देऊन बरे करणारी व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी व तुम्हाला भेटण्यासाठी मुद्दाम आले आहे. आता माझी तब्येत ठीक आहे. मी दररोज अक्षरे म्हणते.' त्या मला भेटण्यासाठी एसटी ने पुण्याला आल्या होत्या.

माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास होता. माझेकडे राहिला आल्यावर दोन दिवसात मेदूवडे केले होते. तेलकट म्हणून वड्याचा वरचा भाग काढून दोन लहान वडे खाल्ले. थोडा त्रास वाटला. मी तिला सर्व अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. ती दररोज म्हणायला लागली अठवड्याभरानी परत मेदूवडे केले होते, तेव्हा तिने जसेच्या तसे ५-६ वडे सांबर घेऊन खाल्ले. आणि तिला बाधले नाहीत.

पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!

आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.

मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बरेचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्
रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते. आपल्याला जरूर फायदा होईल. आपले अनुभव मला जरूर कळवावेत.

मूलाधार चक्राची अक्षरे -

वं, शं, षं, सं

स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे -

बं, भं, मं, यं ,रं, लं

मणिपूर चक्राची अक्षरे -

डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं

अनाहत चक्राची अक्षरे-

कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं

विशुद्ध चक्राची अक्षरे-

अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः

आज्ञा चक्राची अक्षरे-

हं, क्षं

अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे जून २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले 'षट्चक्रे आणि आरोग्य' हे पुस्तक अभ्यासावे.

अरविंद जोशी BSc
९४२१९४८८९४

वरिल लेखाला ग्रंथाधार शास्त्राधार आहे की नाही मला माहीत नाही. ज्या अभ्यासूंना ग्रंथाधाराची गरज वाटते त्यांनी ग्रंथ शोधावेत मला विचारू नये. माझे काम अनुभव घेणे व फायदा झाला तर इतरांना सांगणे हे आहे.